फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गोवा बनावटीची दारू जप्त......सावंतवाडी पोलिसांची थरारक कारवाई!
सावंतवाडी
गोवा बनावटीची दारू घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या एका इनोव्हा कारचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चौकुळ रस्त्यावर थरारक कारवाईत पकड केला. या कारवाईत ₹६ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आंबोली पोलिस चेकपोस्टवर वाहन तपासणी सुरू असताना, सावंतवाडीकडून येणारी इनोव्हा (MH 02 BD 2917) गाडी पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता भरधाव पळ काढला. पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौकुळ येथे रस्ता रोखला आणि वाहनाला गाठले.तपासणीदरम्यान गाडीत गोवा बनावटीच्या २० बॉक्समध्ये विविध ब्रँडची दारू आढळून आली. तिची किंमत ₹१,०२,०००/- असून, ₹५ लाख किमतीचे वाहन असा एकूण ₹६,०२,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक करण्यात आलेल्यांमध्ये सतीश भीमराव आर्दळकर (३७, अडकूर, चंदगड) व अविनाश दशरथ पाटील (३२, बोंदुर्डी, चंदगड) यांचा समावेश आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे व गौरव परब यांच्या पथकाने केली.
या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

konkansamwad 
