नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य समाजास दिशादर्शक - प्रसन्ना देसाई

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य समाजास दिशादर्शक - प्रसन्ना देसाई

 

वेंगुर्ला

 

      नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य आजही समाजास दिशादर्शक असेच आहे. त्यांचे आक्रमक नेतृत्व, प्रखर विचार आणि शौर्य हे निश्चितच आदर्शवत आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले. वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथे  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात देसाई बोलत होते. सुरुवातीला मुख्याधिकारी हेमंत किरुळकर व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक सुधीर पालयेकर, विनय नेरुरकर, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, तसेच नगरसेविका आकांक्षा परब, सुषमा प्रभुखानोलकर, शीतल आंगचेकर, गौरी माईणकर, रिया केरकर, लीना म्हापणकर आणि काजल कुबल उपस्थित होत्या. प्रशासकीय विभागातून अधिकारी अभिजित पाटील, रमेश मुन्ने, गणेश कांबळे, अभिषेक पाटील, अक्षय तोरस्कर, माजी अधिकारी संगीता कुबल, सागर चौधरी यांच्यासह नगरपरिषदेचे विविध विभागातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.