वेंगुर्ला नगरसेवक आरक्षणात खुल्या गटावर अन्याय?.......विवेक कुबल यांचा निवडणूक विभागाला सवाल!
वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या आरक्षण यादीतून एक नवीन वाद उभा ठाकला आहे. कुबलवाडा येथील विवेक कुबल यांनी या आरक्षणातील विसंगतीवर थेट प्रश्न उपस्थित करत निवडणूक विभागाकडे लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.
एकूण २० जागांपैकी १ अनुसूचित जातीसाठी, ५ OBC साठी आरक्षित. पण OBC च्या २ जागांचा समावेश खुल्या गटात केल्याने “खुला गट” फक्त ३५% राहिला.
तर महिलांसाठी एकूण ६०% जागा आरक्षित ठरत असल्याचे कुबल यांनी निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे आता प्रश्न असा“हे सुप्रीम कोर्टाच्या ५०% आरक्षण मर्यादेचे उल्लंघन नाही का?”
“महिलांना सन्मान की खुल्या गटावर अन्याय?”
या मुद्द्यावरून वेंगुर्ला शहरात चर्चेला जोर आला आहे. काहीजण या आरक्षणाला “महिलांना विशेष प्राधान्य” म्हणत समर्थन देत आहेत, तर काहींच्या मते “खुल्या गटाचे प्रमाण कमी करून न्यायाचा समतोल बिघडवला गेला आहे.”
श्री. विवेक कुबल यांनी याबाबत निवडणूक विभागाकडे अधिकृत पत्र सादर केले आहे.

konkansamwad 
