विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे : परितोष कंकाळ. मदर तेरेसा स्कूल येथे पावसाळी मैदानी खेळांचा शुभारंभ.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे : परितोष कंकाळ.  मदर तेरेसा स्कूल येथे पावसाळी मैदानी खेळांचा शुभारंभ.

वेंगुर्ला.

     मदर तेरेसा स्कूल पावसाळी मैदानी खेळ शुभारंभ कलानगर मैदानावर वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे मॅनेजर फादर फ्रान्सिस डिसोजा उपस्थित होते. या स्पर्धा 16 ऑगस्ट व 17 ऑगस्ट या दोन दिवस घेण्यात आल्या, यामध्ये पहिली ते दहावी  सर्व मुलांनी सहभाग दर्शविला. पहिली ते चौथी, तसेच 14 वर्षा खालील विद्यार्थी व 17 वर्षाखालील विद्यार्थी या गटांमध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, रस्सीखेच असे सांघिक मैदानी खेळ तसेच गोळा फेक यासारखे खेळ घेण्यात आले. पहिल्या दिवशी दहावी विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक शिक्षक संघ मिळून कबड्डी सामन्याने सुरुवात करण्यात आली.
   दुसऱ्या दिवशी वेंगुर्ला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश राठोड उपस्थित होते. हे खेळ यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून त्यामुळे संघभावना आणि व्यक्तिमत्व विकास होत असल्याने खेळात अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन श्री परितोष कंकाल यांनी केले.तसेच श्री. योगेश  राठोड यांनी खेळात प्रगती करून विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक समिती सर्व सदस्य तसेच खेळासाठी पंच म्हणून जयराम वायंगणकर, यशवंत चुडनाईक, हेमंत गावडे, गौरेश वायंगणकर, संजीवनी परब इत्यादी उपस्थित होते.सर्वांचे आभार शाळेचे सहाय्यक शिक्षक सतीश वारंग यांनी मानले.