'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण' मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पंचायत समिती अग्रेसर

'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण' मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पंचायत समिती अग्रेसर

 

मालवण

 

     स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण पंचायत समितीने अग्रेसर राहून आदर्शवत असे काम केले आहे. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या नेतृत्वात मालवण पंचायत समितीची ही भरारी सर्वच क्षेत्रात राज्य व देशपातळीवर नावलौकिक करावी. असे गौरवद्गार कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी मालवण पंचायत समिती येथे बोलताना व्यक्त केले. आमदार म्हणून आपण सदैव सोबत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी सर्वांना दिला.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत मालवण पंचायत समितीने 118 टक्के पेक्षा जास्त टार्गेट पूर्ण केले आहे. अभिप्राय नोंदणी व सर्वेक्षणात जिल्हा स्तरापेक्षा दुप्पट अशी ही भरारी आहे. सर्वेक्षण अभियान शेवटच्या दिवशी या संपूर्ण कामाचा आढावा आमदार निलेश राणे यांनी पंचायत समिती येथे उपस्थित राहून गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडून घेतला. तसेच या अभियानात आपला अभिप्रायही नोंदवला आहे.यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.