पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी रॉबिन सिंग यांचा देशव्यापी सायकल प्रवास.

पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी रॉबिन सिंग यांचा देशव्यापी सायकल प्रवास.

कणकवली.

    उत्तर प्रदेशच्या इटावा शहरातील रॉबिन सिंग हे गेल्या ४२८ दिवसांपासून सायकलवरून पर्यावरणाचा संदेश देत फिरत आहेत.२२ राज्ये, ४०० जिल्हे आणि २५ हजार, ५०० किलोमीटरचा प्रवास करून ते दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी फोंडा घाट येथे दाखल झाले.माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न,पाणी आणि हवा आजच्या घडी ला प्रदूषण चा सामना करत आहेत आणि त्यांचे महत्व लक्षात घेऊन जनजागृती करतोय असे  रॉबिन सिंग यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ते पर्यावरणाचा संदेश सगळीकडे पोहचवताना दिसत आहे. फोंड्या मध्ये वनपरिक्षेत्र कणकवली मधील अधिकारी व कर्मचारी तसेच  विद्यामंदिर हायस्कूल,हरकुळ खुर्द चे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रॉबिन सिंग यांचे स्वागत केले. आणि प्रेरणादायी हरीत भारत मोहीम याविषयी संवाद साधला तसेच पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.रॉबिन सिंग हे शेतीचा व्यवसाय करतात. इटावा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण गतिविधीचे ते संयोजक आहेत. दि. ६ ऑक्टोबर २०२२ पासून त्यांनी कन्याकुमारी येथून पर्यावरण संरक्षण सायकल रॅलीला सुरुवात केली. विविध राज्यांमध्ये शेकडो ठिकाणी त्यांनी हजारो नागरिक, महाविद्यालयीन तरुणांशी, महिलांशी संवाद साधला. झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, पाण्याची बचत करा,हरित घराचा संदेश ते देत आहेत.
   सदर कार्यक्रमास कणकवली वनपरिक्षेत्र अमित कटके,फोंडा वनपाल डी. आर.कोळेकर, वनरक्षक अतुल खोत,सिद्धार्थ शिंदे तसेच विद्यामंदिर हायस्कूल,हरकुळ खुर्द चे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.