वेंगुर्त्याची पत्रकारिता निकोप आणि निर्भिड - जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तालुका पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न

वेंगुर्त्याची पत्रकारिता निकोप आणि निर्भिड - जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी  तालुका पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा संपन्न


वेंगुर्ले
      सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संचलित वेंगुर्ले तालुका पत्रकार संघातर्फे काल 25 जानेवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र वेंगुर्ले कॅम्प येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघातर्फे घोषित करण्यात आलेल्या पत्रकार स्व. संजय मालवणकर व अरुण काणेकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. पत्रकार अजित सिताराम राऊळ (कोकण संवाद), प्रदीप गंगाराम सावंत (दैनिक तरुण भारत संवाद), सुनील केशव मराठे (साप्ताहिक कीरात) व शंकर सिताराम घोगळे (दैनिक प्रहार परूळे प्रतिनिधी) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भरत सातोसकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त प्रदीप सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
       वेंगुर्त्याची पत्रकारिता निकोप आणि निर्भिड असल्याचे पहायला मिळते. वेंगुर्ले तालुक्याच्या जडणघडणीत पत्रकारांचेही मोठे योगदान आहे. वेंगुर्ल्यातील पत्रकारांनी अधिक जोमाने समाजोपयोगी पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ले येथे केले.
    या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के गावडे, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, उद्योजिका प्रज्ञा परब, वेंगुर्ला तहसीलदार ओमकार ओतारी, वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी पारितोष कंकाळ, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, संजय पुनाळेकर, उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, सचिन परुळकर, नितीन मांजरेकर, बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.बी चौगुले, साहित्यिका वृंदा कांबळी तसेच अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते 
      मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सिमियन कार्डोज, सचिव विनायक वारंग, उपाध्यक्ष योगेश तांडेल, खजिनदार प्रथमेश गुरव, सदस्य दाजी नाईक, दीपेश परब, के. जी. गावडे, भरत सातोस्कर, एस. एस. धुरी यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर यांनी केले. तर आभार दीपेश परब यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण संवादचे परवेज शेख, दीप्ती पंडित, संजना रेडकर वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला, बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, पत्रकार संघाचे सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षांचे सहकार्य लाभले.