मानवाच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि शाश्वत नात म्हणजे मैत्री

मानवाच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि शाश्वत नात म्हणजे मैत्री! रक्ताच नात जन्मतःच ठरलेला असत; मैत्री ही आपल्या मनाने आणि निवडीने जोडलेली नाळ आहे. अनेक नाते काळासोबत कमी जास्त होतात, पण खरी मैत्री काळाला झुगारून उभी राहते. ती मदतीची, प्रेमाची, आणि विश्वासाची सावली असते. बालपणीचा मित्र, शाळेतील, कॉलेजमधला किंवा आयुष्याच्या कुठल्याही वळणावर भेटणारा जिवाभावाचा मित्र–हे सगळेच आपल्या जीवनात अनेक रंग मिसळतात. प्रत्येकाच्या जीवनात ‘मैत्री’च एक वेगळ स्थान असत. कधी आनंदात, कधी दुःखात, संकटात किंवा यशात–मित्र हा नेहमीच आपल्या मनातल्या गोष्टी न बोलता समजणारा, समजावून घेणारा आणि पाठीशी उभा राहणार असतो. मैत्रीच्या नात्यांमध्ये कोणतीही अपेक्षा नसावी, खोटी उदारता नसावी आणि अहंकार तर बिलकुलच नसावा. बऱ्याचदा आपण आपल्या जवळचे दुःख आई-वडिलांनाही सांगू शकत नाही पण त्याच्या खांद्यावर डोक टेकवताच हलक होत. त्याच्या एका हास्याने जरी दूर असला तरी "मी आहे" या शब्दानेच मनाला नवी उमेद मिळते. सध्याच्या धावपळीच्या काळात, सोशल मीडियावर मैत्रीच्या मित्रयादीमध्ये हजारो नाव असली, तरी खऱ्या दुनियेत आहेत दोन–तीन ‘जिवाभावाचे मित्र’ असले तरी जीवन सुंदर होत. ती फक्त समजून घेण्यान, वेळ दिल्याने, आणि प्रेमाने वाढते. एकमेकांचे मने जिंकण–हेच खरे मैत्रीचे सामर्थ्य! आज सारेच कशाच्या तरी मागे धावत आहेत. कधी यश, कधी पैसा, कधी प्रतिष्ठा–पण यातून मैत्रीसाठी वेळ काढण हेच यशाच गमक आहे. म्हणूनच, पुरेशा संवादाने, काळजीने आणि विश्वासाने मैत्री जपली तरच आयुष्यभर आनंदी नभात अशी इंद्रधनुष्य उमटत! खरी मैत्री ही प्रत्येक सत्यता, व्रण, आणि प्रेमाने जोडलेली असते. विसरू नका, घरापासून दूर असतानाही, हक्काच्या या नात्याचे पाय आढळ असतात.