सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस वेंगुर्ला भाजपतर्फे उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस वेंगुर्ला भाजपतर्फे उत्साहात साजरा

 

वेंगुर्ला
 

       सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस वेंगुर्ले येथील भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपाचे कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर त्याचप्रमाणे सुहास गवंडळकर, माजी सभापती निलेश सामंत, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, वैभव होडावडेकर, संकेत धुरी, वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, होडावडा येथील श्री क्षेत्र पालेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव राजबा सावंत, परुळे सोसायटीचे चेअरमन निलेश सामंत, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत कर्पे, कमलेश गावडे, अनसुर सरपंच सत्यविजय गावडे, प्रसाद पाटकर, हेमंत गावडे, साईप्रसाद नाईक, दाजी परब, रामू परब, समीर कुडाळकर, राहुल गावडे, सुजाता पडवळ, सुषमा प्रभूखानोलकर, शीतल आंगचेकर, समिधा कुडाळकर, समिधा नाईक, श्रीम. मकानदार, कृपा मोंडकर, सुजाता देसाई यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.