मानसीश्वर पर्यटन सेवा सह. संस्था उभादांडा अध्यक्षपदी सुशील चमणकर तर सचिवपदी गणपत केळूसकर.

वेंगुर्ला.
श्री मानसीश्वर पर्यटन सेवा सह.संस्था उभादांडा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक वेंगुर्ला निबंधक अधिकारी प्रशांत साळगांवकर व रुपेश मोरे यांच्या देखरेखीखाली पार पाडली. मानसीश्वर पर्यटन सेवा सह.संस्थेच्या अध्यक्षपदी सुशील अर्जुन चमणकर, सचिवपदी गणपत केळूसकर, उपाध्यक्षपदी प्रकाश मोटे तर खजिनदार पदी सत्यविजय मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक विजय वराडकर,नारायण केळूसकर,वल्लभ शिरगांवकर,उत्तम आरावंदेकर,चैतन्य भूते,मनोरंजना टाककर व हर्मायणी खराडे उपस्थित होते.