डिसेंबरपासून चीपी विमानतळावरून डे-नाईट विमानसेवा सुरू!

डिसेंबरपासून चीपी विमानतळावरून डे-नाईट विमानसेवा सुरू!

कणकवली

 

       चीपी विमानतळातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे डिसेंबरपासून डे-नाईट विमानसेवा सुरळीत सुरू होणार असल्याचा दावा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. "देवा भाऊंच्या सरकारच्या काळात सर्व अडथळे दूर करण्यात आले. आता सिंधुदुर्गच्या विकासाला नवे पंख मिळतील," असे त्यांनी सांगितले.
       जिल्हा नियोजन समितीमार्फत विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.