आंबा, काजू, संत्रा फळपीके व रब्बी ज्वारी साठी शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल ४ व ५ डिसेंबर रोजी राहणार सुरू. शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन.
सिंधुदुर्ग.
कोकणातील आंबा, काजू, संत्रा , रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता.
पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२३ असे दोन अतिरिक्त (वाढीव दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. तरी राज्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.