सावंतवाडी तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.७९ टक्के

सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 99.79 टक्के लागला. इन्सुली हायस्कुलची रेश्मा पालव 99.40 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आली. तर मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी विलास रावजी सावंत 98.60 द्वितीय तसेच आर्या रावजी राणे 98.40 टक्के गुण मिळवित तालुक्यात तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या 965 पैकी 963 विद्यार्थी तर 893 पैकी 891 विद्यार्थिनी मिळून एकूण 1858 विद्यार्थ्यांपैकी 1854 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इन्सुली हायस्कुलची रेश्मा पालव 99.40 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आली आहे. तर मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी विलास रावजी सावंत 98.60 द्वितीय तर मिलाग्रीसचीच विद्यार्थिनी आर्या रावजी राणे 98.40 टक्के गुण मिळवित तालुक्यात तृतीय ठरली आहे. बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.