परुळे विद्यामंदिरच्या चार विद्यार्थ्यांना मिळाली ज्ञानज्योत शिष्यवृत्ती
परुळे
विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ, परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी-कुडाळ यांच्या वतीने ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्लोबल फाउंडेशनतर्फे चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹ ३६००/- अशी आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. मिताली संदीप कांबळी, आर्या गुरुनाथ परब, प्रफुल्ल कानू परुळेकर व सम्यक शंकर परुळेकर या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीचे अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांचे संस्था व प्रशाला यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

konkansamwad 
