कणकवली फोंडा येथे अवैधरित्या रानडुक्कर मांस खरेदी केल्याप्रकरणी २ जणांवर कारवाई. कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्याकडून कारवाई.

कणकवली फोंडा येथे अवैधरित्या रानडुक्कर मांस खरेदी केल्याप्रकरणी २ जणांवर कारवाई.  कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्याकडून  कारवाई.

कणकवली. 

   कणकवली मध्ये  फोंडा कासारवाडी येथे अवैधरित्या शिकार करुन रानडुक्कर वन्यप्राण्याचा मांस विकत घेणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ मधुकर येंडे रा. फोंडा व चंद्रकांत शांताराम शिरवलकर रा. फोंडा असे दोघांचे नाव असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,51 व 44 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कासारवाडी येथे येंडे यांच्या राहत्या घरी रनडुक्कराचे मांस ठेवल्याचे वन अधिकाऱ्यांना आढळुन आले.काळ्या रंगाच्या 37 पिशवी मध्ये मांस भरलेले दिसले असून सदरील मांस गुरुनाथ येंडे व चंद्रकांत शिरवलकर यांनी विजय नामक व्यक्ती कडून राधानगरी वरून 21/02/2024 ला सकाळी विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याची कबुली दिली.वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या समवेत फोंडा वनपरिमंडळ अधिकारी धुळु कोळेकर,अतुल खोत व वनसेवक सुधाकर सावंत व पंच यांनी हि कारवाई केली. 
               तरी कोणत्याही गावात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फासकी लावल्याचे/विषबाधा केल्याचे/वन्यप्राण्याच्या मांसाची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास  वनविभागाला तात्काळ कळविणे तसेच अधिक माहितीसाठी Toll Free Number 1926 वर संपर्क करणे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.