वेंगुर्ला भाजपा कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

वेंगुर्ला येथे भारतीय जनता पक्षाच्या तालुका विभागीय कार्यालयात शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या फोटोला हार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाईंचे महत्त्व कार्य आणि त्यांचे समाजावरील उपकार यावर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुषमा खानोलकर यांनी भूषविले. वेंगुर्ला तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ सुजाता पडवळ यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाईंना शिक्षण सेवा करत असताना आलेल्या अडथळ्यांना आणि त्या अडथळ्यांवर सावित्रीबाईंनी कशी मात केली याबद्दल सुंदर विवेचन केले. समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात सुषमा खानोलकर यांनी सावित्रीबाईंचा जीवन प्रवाह मांडला.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुक्यातील आणि परिसरातील महिला मोर्चा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.