कलंबिस्त येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कलंबिस्त येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी

 

       कलंबिस्त पास्तेवाडी येथील लाडू शिवाजी पास्ते (वय ३८) या अविवाहित तरुणाने नैराश्यातून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
      लाडू पास्ते यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ठीक नव्हती. या आजारपणामुळे त्यांना नैराश्य आले होते आणि याच नैराश्यातून त्यांनी आज आपल्या घरातील छताच्या खांबाला दोरीने गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पंचनामा पीएसआय सरदार पाटील, पोलीस हवालदार महेश जाधव आणि अनिल धुरी यांनी तातडीने पूर्ण केला. या आकस्मिक मृत्यूचा अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करत आहेत.