नागवे ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी बेमुदत उपोषण

नागवे ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी बेमुदत उपोषण

 

कणकवली

 

   कणकवली तालुक्यातील नागवे ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करत ग्रामस्थ प्रीतम मोर्ये यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तसेच सिद्धेश राणे, निलेश परब, रमेश राणे उपस्थित होते. सुशांत नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेऊन योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली, आणि अधिकारी यांनी योग्य तो मार्ग काढून न्याय दिला जाईल, असा आश्वासन दिले.  प्रीतम मोर्ये यांनी आरोप केला की, नागवे ग्रामपंचायतचा कारभार मनमानीपणे चालत असून, त्यांच्या वडीलोपार्जित घराचा अर्ज त्यांच्या चुलत भावाच्या नावावर मंजूर केला गेला, जेव्हा आधीच्या अर्जांना फेटाळले गेले होते. ग्रामपंचायतने माहिती न घेतल्याने आणि बहुमताने ठराव मंजूर केल्याने उपोषण सुरू केले असून, सदर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.