सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.३२ टक्के

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.३२ टक्के

 

 

सिंधुदुर्ग

 

         दहावी परीक्षेत दरवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याने गुणवत्तेत आघाडी घेतली असून जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक ९९.३२ टक्के एवढा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी ८८५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रत्यक्षात ८८५० विद्यार्थी परीक्षेला बसले यात ८७९० जण उत्तीर्ण झाले. या निकालात मुलींची टक्केवारी ९९.४८ टक्के तर मुलांची टक्केवारी ९९.१७ टक्के राहिली.

 

  • तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

वैभववाडी १०० टक्के, सावंतवाडी ९९.७८ टक्के, दोडामार्ग ९९.७४ टक्के, वेंगुर्ले ९९.४१ टक्के, मालवण ९९.३९ टक्के, कणकवली ९९.२६ टक्के, कुडाळ ९९.१४ टक्के आणि देवगड ९८.५२ टक्के असा निकाल आहे.