दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांसाठी विशेष विमान
मुंबई
इराण-अमेरिका संघर्षामुळे दुबईतील हवाई वाहतूक ठप्प झाल्याने अनेक महाराष्ट्रीय नागरिक दुबईत अडकले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत स्टार एअरची विशेष विमाने फुजैरा एअरपोर्टहून मुंबईसाठी व्यवस्था केली. यामुळे एकूण १६४ प्रवासी सुखरूप मायदेशी परतणार आहेत . ठाणे, पुणे, उमरगासह अनेक भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला.अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर जोरदार हल्ला चढवला आणि जगात एकच गोंधळ माजला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई मारले गेले. त्यामुळे संतप्त इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ला चढवला. सहा देशातील विविध ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या तळांना इराणने लक्ष्य केलं. दुबईतील अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवताना दुबईतील इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली . यामुळे जगभरातील देशांनी आखाती देशातील विमान उड्डाणं थांबवलीत.भारतातून, महाराष्ट्रातून पर्यटनासाठी, कामासाठी गेलेले अनेक नागरिक दुबईत अडकले असून उड्डाणं रद्द झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परतणं शक्य नाही.यामुळे ते नागरिक, त्यांचे नातेवाईक अतिशय चिंतेत होते. मात्र आता दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांच्या मदतीसाठी देशातील, राज्यातील मोठ्या नेत्याने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार आहेत. आज संध्याकाळी 164 प्रवासी हे मुंबईत दाखल होतील. त्यामुळे महाराष्ट्रवासियांना दिलासा मिळणार आहे.

konkansamwad 
