खारेपाटण येथे भीषण अपघात....युवती जागीच ठार

खारेपाटण येथे भीषण अपघात....युवती जागीच ठार

खारेपाटण

 

    मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण लगत असलेल्या नडगिवे धुरी भाटलेवाडी बसथांब्यासमोर उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. यात तनिषा पुरूषोत्तम शेट्ये (वय १८) ही जागीच ठार झाली. तर तिचा भाऊ ऋतूपर्ण (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे.ही घटना ३ मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. खारेपाटण जिजामातानगर नगर येथील पुरुषोत्तम शेट्ये हे एस टी महामंडळामध्ये चालक म्हणून सेवेत आहेत. होळी सणानिमित्त त्यांची मुलगी तनीषा आणि मुलगा ऋतूपर्ण ही गावी आली होती. त्यांच्याकडे असलेली जुनी अॅम्बेसिडर (एमएच-९ ओबी ४३३९) घेऊन ऋतूपर्ण आणि तनीषा ही खारेपाटण ते तळेरे अशी जात होती. दुपारी साडे बाराच्या सुमारास महामार्गावर नडगीवे धुरीभाटलेवाडी येथील बस स्टॉप समोर रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला त्यानी जोरदार धडक दिली. ट्रक चालक महामार्गालगत ट्रक थांबवून जेवणासाठी गेला होता. या अपघातात अॅम्बेसिडर मधील तनिषा शेट्ये ही जागीच ठार झाली. तर चालक ऋतुपर्ण हा गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.