सत्यवान रेडकर यांच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सत्यवान रेडकर यांच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 

कुडाळ

 

   शासकीय अधिकारी सत्यवान रेडकर यांच्या माध्यमातून कुडाळ आणि देवगड मध्ये निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.सोमवार दि. १ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता, बांव ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांच्या मार्फत जि.प.पू.प्रा. शाळा बांव, ता. कुडाळ येथे हे मार्गदर्शन व्याख्यान होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग प्रबोधिनी मार्फत बुधवार दि. ३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता, शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड, ता. देवगड येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.