मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाट नजीक धावत्या मारुती वॅगनार कारला लागली अचानक आग

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाट नजीक धावत्या मारुती वॅगनार कारला लागली अचानक आग

 

खेड 

 

         मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाट नजीक मोरवंडे गावाजवळ आज धावत्या वॅगनार कारला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. काही क्षणांतच संपूर्ण कार ज्वाळांच्या विळख्यात सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. खेडहून चिपळूणच्या दिशेने कार जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. चालकाला काही कळण्याआधीच कारने पेट घेतला आणि आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले. ज्वाळा इतक्या प्रचंड होत्या की काही मिनिटांतच कार पूर्णपणे जळून खाक झाली.प्रसंगावधान राखत चालकाने जळत्या कारमधून बाहेर उडी मारली. मात्र या प्रयत्नात तो गंभीररित्या भाजला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, कारला लागलेल्या आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास सुरू आहे.