एसटीच्या ‘शिवनेरीची’ धाव आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!....परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई
मुंबई–पुणे महामार्गाची प्रतिष्ठित सेवा म्हणुन ओळख असलेली एस टीची शिवनेरी आता मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी या प्रतिष्ठित सेवेने प्रवाशांचा विश्वास जिंकलेला आहे .शिवनेरीच्या राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई- पुण्या प्रमाणे नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध मार्गावर धावणार आहेत.नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बस सेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला आधुनिक रुप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासा हा आरामदायी ठरणार आहे

konkansamwad 
