मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न
वेंगुर्ला
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्लेमध्ये या वर्षीची पहिली पालक -शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. ही सभा तीन टप्प्यात घेण्यात आली असून प्रत्येक वर्गांचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शाळेतील सहाय्यक शिक्षक-शिक्षिका यांनी सर्व पालक वर्गाला वर्षभरातील वार्षिक नियोजन, शालेय उपक्रम, नियम व शिस्त यांविषयी माहिती दिली तसेच मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन देण्यासाठी डॉ. क्लारा होडावडेकर उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्त, आहार, आरोग्य व अभ्यास याविषयी योग्य माहिती दिली तसेच मोबाईलचे दुष्परिणाम यावर भाष्यदेखील केले. या सभेसाठी विशेष अतिथी म्हणून तालुका वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचन, खेळ, ध्यान, व्यायाम आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत असे सांगितले तसेच तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या सुंदर कवितेतून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

konkansamwad 
