कणकवली तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.२६ टक्के

कणकवली
दहावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९९.२६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यात विद्यामदिर हायस्कूलची विधी चिंदरकर आणि ध्रुव तेंडुलकर यांनी प्रत्येकी ९९.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सेंट उर्सुला हायस्कूल वरवडेच्या नक्षत्रा काळे हिने ९९.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर विद्यामंदिर हायस्कूलच्या अथर्व कोचरेकर याने ९८.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.तालुक्यात दहावी परीक्षेसाठी १४९७ जणांनी नोंदणी केली. यात १४९६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १४८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.