सिंधुदुर्ग विमानतळावरून विमान प्रवास करणाऱ्यांना आनंदाची बातमी. सिंधुदुर्ग ते बंगळुरू आज पासून नवीन हवाई फेरी सुरू.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय ९१ विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 विमान कंपनीची पहिल्या टप्यात हैद्राबाद व बंगळूरू अशी सेवा सुरु होणार आहे. या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली आहे. शासनाच्या उड्डाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील जळगाव, नांदेड, सह सिंधुदुर्गचाही समावेश असून सिंधदुर्ग विमानतळावरुन सेवा सुरू झाली आहे. तसेच हि कंपनी पर्यटकांसाठीही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचे समजते. अशा प्रकारे विमानकंपनी सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू झाल्यानंतर या विमानतळाचे महत्त्व वाढेल अशी आशा आहे. सकाळी विमानतळावर विमान दाखल झाले तेव्हा त्याला सलामी दिली गेल्या नंतर प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. दुपारी 1.15 वा विमान बंगळुरू कडे रवाना झाले व 2.40 मिनिटानी बंगळुरू विमानतळ येथे पोहोचले. यावेळी पाहिल्या प्रवासाचा आनंद प्रवासी यांनी घेतला. नवीन विमान कंपनी असल्याने सध्या गोवा, बंगळुरू, हैदराबाद, सिंधुदुर्ग बंगळुरू आशा फेऱ्या होतील. मे महिन्यात सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू होईल असे विमान कंपनी कडून सांगण्यात आले आहे.
या सेवेचे उद्घाटन नुकतेच झाले असून यावेळी माजी सभापती निलेश सामंत पलाय ९१ कंपनीचे मनोज चाको, आशुतोष चिटणीस, आय आर बि.कंपनीचे कुलदीपसिंग, परूळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, भूषण देसाई, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे, बाळा राऊळ, उपसरपंच संजय दुधवडकर, राणे, करलकर आदी उपस्थित होते.