श्री आई भवानी मित्र परिवाराचा समर्थ आश्रमातील बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा.

श्री आई भवानी मित्र परिवाराचा समर्थ आश्रमातील बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा.

सिंधुदुर्ग.

   विरार येथील श्री.आई भवानी मित्र परिवारचे संयोजक किरण आरोलकर हे जीवन आनंद संस्था परिवारातील एक संवेदनशील मनाचे स्वयंसेवी सक्रीय कार्यकर्ते आहेत.समाजातील निराधार वंचित बांधवांचे सौख्य आणि आनंदा साठी आपल्या परिने सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी ते सतत धडपडत असतात.
   आपल्या भारतीय संस्कृतीत बहिण भावंडांचे नाते जपणा-या रक्षाबंधनच्या सणाचे मोठे महत्व आहे. समाजात आज अनेक बांधवांना कुटुंबातील भाऊ , बहीण आणि नातेवाईक सगेसोयरे असताना  आणि नसताना आश्रमांतील जीवन जगावे लागते. अशा कौटुंबिक सुख आणि आनंदाला दुरावलेल्या बांधवांसह रक्षाबंधन साजरे करण्यासाठी किरण आरोलकर दरवर्षी त्यांच्या श्री.आई भवानी मित्र परिवारातील बंधु भगिनींना घेवून विरारफाटा येथील आश्रमात येतात.
   यंदा नेहमी प्रमाणे किरण यांना त्यांच्या तब्बेतीच्या कारणास्तव रक्षाबंधनच्या दिवशी मित्रपरिवारासह आश्रमातील बांधवांना राखी बांधण्यासाठी येता आले नाही. म्हणून ३ सप्टेंबर रोजी किरण आणि त्यांचे श्री.आई भवानी मित्र परिवारातील बंधु भगिनी रक्षाबंधनसाठी समर्थ आश्रमात आले.विशेषतः परिवारातील भगिनींनी त्यांच्या मुंबईतील रोजच्या धावपळीच्या जीवनातील रविवारची दुपार  समर्थ आश्रमातील बांधवांसाठी राखून ठेवली. आणि या सर्वांनी उत्स्फुर्तपणे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी समर्थ आश्रम मधील सर्व बांधवांना राखी बांधून खाऊ देण्यात आला. तसेच आश्रमातील  बांधवांची गरज ओळखून त्यांना पाणी पिण्याचे ग्लास  भेट देण्यात आले.
   यावेळी महिला भगीणी सौ.अरुणा सरोळकर, सौ. प्रगती लाड, कुमारी खुशी आग्रे, कुमारी श्रेया कदम, कुमारी चैताली कदम, कुमारी धनश्री कदम तसेच श्री अशोक सरोळकर, श्री प्रवीण लाड, कुमार ओंकार शिंदे, कुमार हर्षल राणे, कुमार प्रसाद गावडे हे सर्व उपस्थित होते. आश्रम मधील बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सर्वांना समाधान वाटले.
  जीवन आनंद संस्थेचे किसन चौरे , भाईदास माळी, दिपाली मेघा- माळी तसेच दिपकआबा अडसुळे यांनी सर्वांचे स्वागत केले.