मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.३९ टक्के

मालवण
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाल ९९.३९ टक्के लागला आहे. तालुक्यातून ९८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी ९८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी तर ३६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. १४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. मालवण तालुक्यातील ३४ शाळांपैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे या दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. तर कट्टा वराडकर हायस्कुलची विद्यार्थिनी हर्षदा किसन हडलगेकर हिने ९९. ४४ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तसेच वराडकर हायस्कुल कट्टा येथील श्रेया समीर चांदरकर हिने 98.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकवाला.