राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सावंतवाडीत ‘एकता दौड’ उत्साहात

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सावंतवाडीत ‘एकता दौड’ उत्साहात


सावंतवाडी 


      भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. त्याच निमित्ताने सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात ‘एकता दौड’ उत्साहात आयोजित करण्यात आली होती.
     या उपक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही दौड शिव उद्यान येथून सुरू होऊन नारायण मंदिर येथे समारोप करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत शहरातून काढण्यात आलेल्या या दौडीत पोलीस अधिकारी-अमलदार, रिक्षा चालक-मालक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी युवक आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या उपक्रमामुळे शहरात राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. पोलीस दलाने रिक्षा चालक-मालक आणि युवकांना सोबत घेऊन केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशाच्या ऐक्यासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण ‘एकता दौड’ने पुन्हा एकदा करून दिले.