'सरपंच संवाद' मोबाईल ॲपला सुरुवात - रविंद्र खेबुडकर

ओरोस
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी "सरपंच संवाद” हे मोबाईल ॲप लाँच करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना केले आहे.२२ एप्रिल २०२५ ला जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत "स्वच्छ व सुजल ग्रामसाठी नेतृत्व" या कार्यक्रमात 'सरपंच संवाद' मोबाईल अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामध्ये क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडिया (QCI) या संस्थेच्या सहकार्याने हे अॅप विकसित करण्यात आले असून, याचा उद्देश ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, संवाद आणि नविन उपक्रमांची देवाणघेवाण वाढविणे हा आहे.