कणकवली तालुका खरेदी विक्री संघाकडून भात खरेदीचा शुभारंभ.

कणकवली तालुका खरेदी विक्री संघाकडून भात खरेदीचा शुभारंभ.

कणकवली.

   तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली येथे शासकीय भात खरेदी शुभारंभ कणकवली येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या हस्ते पार पडला.
   यावेळी सिंधुदुर्ग बँक संचालक विठ्ठल देसाई, अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, संचालक गुरुप्रसाद वायंगणकर, प्रशांत सावंत, श्रीमती लीना परब, विनिता बुचडे, शेतकरी राजन परब, मनोहर राणे, जनार्दन डोबकर तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते.
    यावेळी ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत भात नोंदणी केली नाही त्यांनी त्वरित नोंदणी करावी. तसेच नोंदणी करण्याची तारीख ही ३० डिसेंबर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.