अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर प्रचलीत नियमानुसार कार्यवाही.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर प्रचलीत नियमानुसार कार्यवाही.

सिंधुदुर्ग.

  जिल्ह्यात  1 हजार 539 अंगणवाडी कार्यरत आहेत. या अंगणवाडीमध्ये कार्यरत 1 हजार 135 सेविका 348 मिनी सेविका व 1 हजार 167 मदतनीस यांना दिनांक 4  डिसेंबर 2023 पासूनची अनुपस्थिती व त्यामुळे लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेत अंगणवाडी उपस्थित राहण्यासाठी प्रचलीत नियमानुसार कार्यवाही करण्यात आली होती.
   या कार्यवाहीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या शिफारशीनुसार 92 अंगणवाडी मदतनीस, मिनी सेविका यांची शासन निर्णयातील तरतुदीनुसार सेवा समाप्त करण्यात आली होती. या सेवा समाप्तीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल याबाबत संबधितांना लेखी स्वरुपात कळविण्यात आले होते.
   दरम्यान दि. 25 जानेवारी 2024 रोजीच्या सचिव, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य यांचेकडील अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या इतिवृत्तातील नमूद बाबींनुसार तसेच जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अंगणवाडी कामकाज नियमित सुरु आहे. ज्या कर्मचारी यांच्याबाबतीत कारवाई झाल्या प्रकरणी नियमानुसार कार्यवाही करणेचे निर्देश प्राप्त होते. व सर्व संबंधितांना याबाबत अवगत करण्यात आले होते.
   तेव्हा सेवा समाप्ती प्रकरणी विहित शासन निर्णयानुसार अपील व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असल्याने सेवा समाप्ती च्या 36 पैकी 12 अपील प्राप्त झाल्याने त्याबाबतची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावरून सुरु आहे. तसेच उर्वरित प्रकरणी अपील प्राप्त होताच विचारार्थ घेण्यात येतील.
   यासंबधित काही त्रयस्थ व्यक्ती अपील करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना अपील करण्यात अटकाव करून वर्तमानपत्र तसेच समाजमाध्यमावर असत्य विधाने तसेच अफवा पसरवत असल्याचे दिसून येते, तेव्हा याप्रकरणी अपील सादर न केलेल्या अंगणवाडी कर्मचारी यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे अपील सादर केल्यास त्यावर निर्णय घेणे शक्य होईल.
   प्रस्तृतबाब संबंधितांना लेखी स्वरुपात निदर्शनास आणून देण्यात आलेली असून याबाबत अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.