करूळ घाटात कंटेनरने घेतला अचानक पेट

करूळ घाटात कंटेनरने घेतला अचानक पेट

 

वैभववाडी

 

       वैभववाडीतील करूळ घाटात कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह असलेले डोझर मशीनही जळाले आहे. कंटेनर करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता. गगनबावडा पासून ४ कि. मी. अंतरावर त्याने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच ठेकेदाराने तात्काळ पाण्याचे टँकर पाठवले. या दुर्घटनेत कोणती जीवित हानी झाली नाही.