उद्या हडपीड स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

देवगड.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे ६ मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी सकाळी ७ वा. पादूका पूजन, १०.३० वा. नामस्मरण, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. श्री स्वामी कृपा तारकमंत्र पठण, ४ वा. शिरगाव वारकरी सांप्रदाय यांचा विठूनामाचा हरिपाठ, सायंकाळी ६ वा. कलाप्रेमी कराओके सिंगींग क्लब, देवगड यांचा अभंगवाणी,अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी – मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.