जागतिक बाजारपेठेत तेलदरांमध्ये ६०% वाढ....इंधन तेलाचे दर ११० डॉलर्स पार
नवी दिल्ली
भारतात कच्च्या इंधन तेलाची कोणतीही कमतरता नसून तेलाचा ओघ पुरेशा प्रमाणात येत आहे. भारताने तेल मिळविण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे तेलाची टंचाई जाणावणार नाही, असे स्पष्टीकरण तेल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. भारताची परिस्थिती सुखावह असून पुरवठ्यासंदर्भात २०२० नंतर प्रथमच तेलदर १०० डॉलर्सच्या वर गेले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. ही सामुद्रधुनी अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांच्या तेलनौकांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, इतर देशांसाठी ती मोकळी आहे, अशी घोषणा इराणने केली होती. तथापि, हल्ला होण्याच्या भीतीपोटी अनेक तेलकंपन्या या मार्गाने तेलनौका आणण्यास कचरत आहेत. त्यामुळे तेलाचा ओघ कमी झाला आहे. हे तेलदर वाढण्याचे मोठे कारण आहे. २०२० मध्ये तेलदर वाढल्याने भारताने अमेरिकेच्या सूचनेनुसार रशियाकडून तेलखरेदीला मोठ्या प्रमाणात प्रारंभ केला होता. आता भारत आणखी चार आठवड्यांपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. रशियाचे तेल लवकरच भारतात येत आहे. भारत जवळपास ६० देशांकडून तेल खरेदी करत आहे.युद्ध लवकर न थांबल्यास इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. रुपयाची आणखी घसरण, त्यामुळे आयात महाग होण्याची शक्यता व्यक्त सध्या तरी भारतात पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ नाही, असा दिलासा.भारताचा रुपया पुन्हा घसरणीला लागला आहे. युद्धाच्या प्रभावामुळे रुपयाची किंमत सोमवारी ९२ रुपये ३३ पैसे प्रतिडॉलर इतकी झाली आहे. हा आतापर्यंतचा नीचांक आहे. भारताप्रमाणे अन्य देशांचे चलनही घसरले आहे. तर डॉलर मात्र बळकट होत आहे. तेलाचा पुरवठा जागतिक बाजारपेठेत पूर्ववत झाल्यानंतर रुपयाची किंमत वधारण्याची शक्यता आहे,असे तज्ज्ञांचे मत आहे.युद्ध दीर्घकाळ' लांबल्यास तेलदरात आणखी वाढ शक्य आहे.' त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांवरही दबाव येऊ शकतो. डिझेलचे दर वाढल्यास वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने इतर वस्तूंचे दरही वाढू शकतात. अशा प्रकारे डिझेल दरवाढीचा परिणाम बहुविध पद्धतींनी होऊ शकतो. सध्या भारतासाठी विशेष अडचणीची स्थिती नसली तरी भविष्यात ती निर्माण होऊ शकते. युद्ध लवकरात लवकर थांबल्यासच परिस्थिती नियंत्रणात राहू शकते, असे मत व्यक्त होत आहे.युद्ध लांबल्यास होणाऱ्या तेलदरवाढीचा सर्वाधिक फटका विमान प्रवासाला बसणार आहे. कारण, विमान कंपन्यांना सर्वाधिक खर्च इंधनावर करावा लागतो. इंधन महागल्यास विमान प्रवासाचे भाडे मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम विमानप्रवास उद्योगावर होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्या दृष्टीने सज्जता ठेवणे आवश्यक आहे. युद्ध लवकर थांबल्यास परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागणार आहे.

konkansamwad 
