मालवण तालुक्यातील कोळंब येथे गोळीबार
मालवण
मालवण तालुक्यातील कोळंब खालची वाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेली. घराच्या परिसरात सर्वत्र बंदुकीच्या शरें पडलेले दिसून आले. रविवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान गोळीबार करणारी व्यक्ती स्वप्नील शिर्सेकर त्यांच्या समोरील कंपाऊंड येथून पळून गेला.ज्याठिकाणीहून गोळीबार करण्यात आला त्याठिकाणी बुटांचे ठसे आढळून आले आहेत. दरम्यान संदीप शेलटकर यांनी हा आपल्याला संपविण्याचा प्रयत्न होता. असे सांगत सुदैवाने आपण यातून सुटलो असून पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन ताब्यात घ्यावे. अशी मागणी केली आहे.गोळीबार झाल्यानंतर संदीप शेलटकर यांच्या घराच्या परिसरात सर्वत्र गोळीचे शेरे पसरलेले होते. किचन रुम, दुचाकी, अंगणात शेरे दिसून आले आहेत. संदीप शेलटकर यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणी आणि उडालेल्या छरे यांची तपासणी करण्यात आली आहे. संदीप शेलटकर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

konkansamwad 
