सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनामुळे ६ जणांचा मृत्यू; १५०० पर्यटक अडकले.

सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनामुळे ६ जणांचा मृत्यू; १५०० पर्यटक अडकले.

गंगटोक.

   सिक्कीममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर १५०० पर्यटक अडकून पडले आहेत. राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
  सिक्कीममध्ये अनेक पर्वतीय सरोवरे आहेत, ज्यामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर भूस्खलन होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी एकाच वेळी खाली जाते. यामुळे अनेक दुर्घटना घडतात. गेल्या वर्षी अशाच एका घटनेत एक धरण वाहून गेले होते, ज्याद्वारे १२०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा वीज प्रकल्प उभारला जाणार होता.
   यावेळी भूस्खलनामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सरकार आधीच सतर्क झाले असून अनेक तलावांवर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर सिक्कीममध्ये दळणवळणाचे मार्ग बंद झाले असून राज्याचा हा भाग उर्वरित भागापासून तुटला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, उत्तर सिक्कीममध्ये ५२४५ मीटर उंचीवर असलेल्या दक्षिण लोनाक सरोवरात हिमनदीचा उद्रेक झाला. तो ढिगारा घेऊन खाली आला आणि तिस्ता धरणावर आदळला आणि धरण फुटले. यामुळे बराच विध्वंस झाला. अनेक पूल वाहून गेले,१०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.