वेंगुर्ला शिवसेनेकडून महिलांचा सन्मान

वेंगुर्ले
शिवसेनेच्या वेंगुर्ले शहर महिला संघटनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिलांसाठीच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनने झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरात शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दत्तराज नर्सरी व दत्तराज कॅश्यु फॅक्टरीच्या संचालिका उर्मिला येरम, ओरोस येथील जिल्हा महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी मिलन कांबळे, आरोग्य सेविका विनिता तांडेल, योगशिक्षिका साक्षी बोवलेकर, उद्योजिका स्वाती बेस्ता आदी मान्यवरांचा समावेश होता. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा खास गौरव कार्यक्रम संपन्न झाला. या महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मनोरंजनाच्या खेळात प्रथम क्रमांक पटकावलेल्या साक्षी परब यांना एलईडी 32 इंची टीव्ही, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या सुहानी परब यांना गॅस शेगडी, तृतीय क्रमांक पटकावलेल्या सेजल भाटकर यांना मिक्सर, तर उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेल्या पूजा भुरे व समिधा रेडकर यांना प्रत्येकी प्रेशर कुकर अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मनोरंजन खेळाच्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम, महिला शहर प्रमुख ॲड. श्रद्धा बाविस्कर-परब, उपशहर प्रमुख मनाली परब, अल्पसंख्यांक शहर प्रमुख शबाना शेख, उद्योजिका उर्मिला येरम व आकांक्षा येरम यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमांमध्ये महिलांनी डान्स व गायन सादर केले. या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळालेल्या महिलांनी स्वतःच्या कुटुंबाचा विकासाच्या दृष्टीने शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपले दरडोई उत्पन्न वाढवा. मेघालय राज्यात पर्यटन दृष्ट्या चाललेल्या व्यवसायात 70% महिला काम करत आहेत. त्याप्रमाणे आपण महिलांनी सिंधु-रत्न तसेच शासनाच्या अन्य महिलांसाठीच्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यास आपण आवश्यक ते सहकार्य करीन असे स्पष्ट केले. शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी जागतिक महिला दिन म्हणजे महिलांना एकत्र येण्याची एक संधी. त्यातूनच नारीशक्तीचा गौरव होत आहे. या गौरव सत्कारातून महिलांना अधिक प्रोत्साहन मिळेल या उद्देशाने शिवसेनेतर्फे आयोजित करतो. कर्तुत्वान महिलांचा सत्कार व खेळ मनोरंजन स्पर्धा अशा स्वरूपात कार्यक्रम आहे. महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मिळत असलेली संधी सोडू नये. या मेळाव्यात महिलांनी दाखवलेली उपस्थिती उस्फूर्त असून ही महिलांची एकजूट आहे असे मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षामार्फत नेहमीच महिलांना बचत गट सिंधु रत्न योजनेच्या च्या माध्यमातून विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांनी दालन खुले करून महिलांसाठी विविध उद्योग व्यवसाय सिंधू रत्न मध्ये बसवून प्रोत्साहन दिलेले आहे त्याचा लाभ घ्यावा असे स्पष्ट केले तर ओरोस येथील राष्ट्रीय महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी मिलन कांबळे यांनी शासनाच्या महिलांसाठी विविध योजना असून त्याचा लाभ आपल्या पाल्यांसाठी, अनाथ मुलांसाठी करून घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत शिवसेनेच्या वेंगुर्ला उपशहर महिला संघटक मनाली परब व शहर अल्पसंख्यांक महिला संघटक शबाना शेख यांनी केले तर प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभाराचे काम शिवसेनेच्या वेंगुर्ले शहर महिला प्रमुख ॲड. श्रद्धा बाविस्कर-परब यांनी पाहिले. महिलांच्या या मनोरंजन खेळाचे निवेदन शुभम धुरी यांनी केले. या कार्यक्रमास महिलांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.