अन्यायाच्या विरोधात सावंतवाडीत गर्भवती महिलेचे आमरण उपोषण
सावंतवाडी
जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात महिलांचा गौरव होत असताना, दुसरीकडे सावंतवाडीत एका गर्भवती महिलेला आपल्या हक्कासाठी आमरण उपोषणाला बसावे लागले आहे. वरिष्ठांचे आदेश असूनही ग्रामपंचायत स्तरावर 'डाटा एन्ट्री ऑपरेटर' म्हणून कामावर रुजू करून घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ वैभवी प्रशांत साटेलकर यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.वैभवी साटेलकर यांना ग्रामपंचायत विभागात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्याला यश न आल्याने अखेर त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
konkansamwad 
