मळई येथे २२ व २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

मळई येथे २२ व २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

देवगड.

   मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा यांच्यावतीने मळईवाडी हनुमान मंदिर येथे २२ व २३ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर वर्धापन दिन व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
   या निमित्ताने दिनांक २२ रोजी सकाळी ७.३० वा. पूजा, आरती, ९ वा. लघुरुद्र, ११ वा. पासून मळई मर्यादित विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला, कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर व प्रश्नोत्तर स्पर्धा), सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, रात्री ८ वा. श्री देव मांडकरी प्रासादिक भजन मंडळ, मळई यांचे भजन, रात्री १० वा. श्री पावणाईदेवी प्रासादिक भजन मंडळ, किंजवडे परबवाडी यांचे दिंडी भजन.
   २३ रोजी सकाळी ६. १८ वा. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, दर्शन व तीर्थप्रसाद, ८ वा. पालखी पद्रक्षिणा, ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांसाठी होम-मिनीस्टर स्पर्धा (मळई मर्यादित), ७ वा. महाआरती, रात्री ८ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. स्पर्धांचे बक्षीस वितरण, १० वा. स्थानिक कलाकारांची धमाल विनोदी एकांकिका लग्न कल्लोळ, ११ वा. ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी यांचे समई नृत्य सादर होणार आहे.या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.