रत्नागिरी शहरातून महायुतीची काढण्यात आली प्रचारफेरी.

रत्नागिरी.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी काल सायंकाळी ६-३० वा. चे सुमारास रत्नागिरी शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली.या प्रचारफेरीची सुरवात एसटी स्टँड येथून करण्यात आली ही प्रचारफेरी शहरातील मुख्यबाजारपेठ श्रीराम आळी, गोलखे नाका, मारूती आळी मार्गे आठवडा बाजार करून परत तेली आळी नाका येथे या प्रचारफेरीची सांगता झाली.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सुजाता ताई साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, भाजपा शहराध्यक्षा पल्लवी ताई पाटील, भाजपा माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, समीर तिवरेकर, राजु तोडणकर तसेच सचिन करमरकर, दादा ढेकणे, अशोक वाडेकर, अमित विलणकर, मंदार मयेकर, सचिन गांधी, वर्षा ढेकणे तसेच शिवसेनेचे राहुल रसाळ, केतन शेट्ये इत्यादि महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारफेरीत सहभागी झाले होते.