२२ हजार दुचाकीस्वारांना ट्रिपलसीट पकडले....नागपूर पोलिसांचा दणका ....ऑपरेशन यू-टर्न मोहिमेची शहरात चर्चा...
नागपूर
शहरातील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत आहे. त्यात दुचाकीवर दोघांचीच परवानगी असताना दोन पेक्षा अधिक संख्येने प्रवास करणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. शहर पोलीस हद्दीतील १० वाहतूक पोलीस ठाण्यांनी ट्रिपल सीट वाहनचावणाऱ्या २१ हजार ७६२ वाहनधारकांना दणका दिला. यात ट्रिपल सीट वाहन चलवणाऱ्यांमध्ये इंदोरात सर्वाधिक २,७६४ जण आढळले. त्या खालोखात एमआयडीसीत २,५३१ तर कामठीत २,४९५ जणांना वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करण्यात आली.चुकीच्या दिशेने वाहन चलवणाऱ्यांच्या संख्येत एमआयडीसीत सर्वाधिक १,६९० तर सक्करदरात १,५७६ आणि कॉटन मार्केटमध्ये १,५५० जणांना कारवाईला सामोरे जावे लागले. आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन यू-टर्न' मोहिमेत चालू वर्षामध्ये गेल्या तीन महिन्यांत या कारवाया करण्यात आल्या. शहरातील विविध झोनमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणे ५,९६८ वाहनधारकांना चांगलेच महागात पडले. त्यांच्या विरुद्ध वाहतूक शाखेने गुन्हा दाखल करत वाहनधारकांचे परवान निलंबित केले. अन्न पदार्थ पोचवताना धोकादायक वेगाने वाहन चालवणाऱ्या १,८८७ डिलिव्हरी बॉयवर कारवाई करण्यात आली.ट्रिपल सीट वाहन चालवताना ६१अल्पवयीन मुले आढळली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पालकांवर गुन्हे दाखल केले. यातही सर्वाधिक १५ मुले सोनेगावात, १४ बालके लडकगंजमध्ये, सदरमध्ये ९ तर कामठीत ७ अल्पवयीन बालके ट्रिपल सीट वाहन चालवताना आढळले. कारवाई झाल्याने या बालकांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन परवाना दिला जाणार नाही.शहरात वाहतूक शाखेने तिन महिने राबवलेल्या मोहिमेत ५ हजार ९५८ वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळले. यात सोनेगाव विभागात सर्वाधिक ७९४ डीडी प्रकरणे नोंदवली गेली. कॉटन मार्केट परिसरात ६७३,एमआयडीसीत ६६८, लकडगंजमध्ये ६५८ तर सदरमध्ये ६५० वाहनचालक मद्यप्राशन करून असल्याचे आढळले.वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी जड वाहतकूदारांना दिवसा शहर हद्दीत प्रवेशास मनाई आहे. ती धुडकावून शहर हद्दीत वाहतूक करणाऱ्या २५,०९९ जड वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. यात अजनीमध्ये ५,१७६, लकडगंजमध्ये ४,६८८ आणि इंदोरा ४,०४२ जड वाहतूकदारांना दंड लावण्यात आला.शहरात सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी वाहतूक शाखा कटिबद्ध आहे. ऑपरेशन यू-टर्न' ही मोहीम केवळ दंडात्मक नाही तर लोकांना वाहतूक शिस्तीची सवय लागावी यासाठी आहे. – लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

konkansamwad 
