डेगवे येथील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० जणांनी केले रक्तदान.

सावंतवाडी.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ डेगवे व सिंधु रक्तमित्र मित्र प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डेगवे गावात प्रथमच घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५० दात्यांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे यावेळी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली त्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. चष्मा वाटप कार्यक्रमासाठी देसाई ऑप्टिशियनचे प्रोप्रायटर रामा देसाई व डॉ. सदानंद देसाई तसेच अमृत देसाई यांनी विशेष सहकार्य केले.
युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी गावातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्र मंडळ डेगवेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.