प्राजक्ता गवाणकरची 'राजपत्रित' अधिकारी म्हणून निवड
कुडाळ
प्राजक्ता राजाराम गवाणकर हिने स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक अभियंता श्रेणी-२' या पदावर आपली मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये तिची निवड झाली असून, या परीक्षेत यशस्वी ठरणारी ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार आहे. विशेष म्हणजे, तिची पहिली नियुक्ती सिंधुदुर्ग नगरी येथेच झाली आहे.प्राजक्ताचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण गेल्या दोन वर्षांत तिची एकूण ५ वेगवेगळ्या सरकारी पदांवर निवड झाली असून, सध्या ती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. दररोज १२ ते १४ तास अभ्यास, सातत्य आणि कुटुंबाची साथ यामुळेच हे यश मिळाल्याचे तिने सांगितले. "सिंधुदुर्ग जिल्हा स्पर्धा परीक्षेत मागे राहू नये" यासाठी आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस तिने व्यक्त केला असून, आपल्या पदाचा वापर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी करणार असल्याचा निर्धार प्राजक्ताने बोलून दाखवला आहे.
konkansamwad 
