आनंदवाडी येथील महादेव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन.

वेंगुर्ला.
वेंगुर्ला आनंदवाडी येथील रहिवासी महादेव सोमा जाधव. (वय ७३) वर्षे यांचे सोमवार दिनांक १५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
महादेव जाधव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गृहरक्षक दलामध्ये ३० वर्ष सेवा केली होती.तसेच महिला औद्योगिक काथ्या कारखाना वेंगुर्ला येथे त्यांनी वॉचमन म्हणून काम केले होते.त्यांचा पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. दातांचे डॉक्टर डाॅ.सचिन भांडे यांची असिस्टंट अर्चना जाधव यांचे ते वडील होत.