ज्येष्ठ नागरिक संघाकडून रुग्णवाहिकेसाठी ५१ हजाराची मदत....सामाजिक बांधिलकी कडे धनादेश

ज्येष्ठ नागरिक संघाकडून रुग्णवाहिकेसाठी ५१ हजाराची मदत....सामाजिक बांधिलकी कडे धनादेश

सावंतवाडी

 

    सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी नव्याने घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या वतीने ५१ हजार ५०० रुपयांची रोख देणगी देण्यात आली. अण्णा देसाई आणि प्राध्यापक सुभाष गोवेकर यांच्या पुढाकारातून ही मदत सुपूर्द करण्यात आली असून, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जिल्हास्तरावरील कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी बोलताना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि रूपा मुद्राळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आपली संस्था नेहमीच पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, ज्येष्ठ नागरिक तरुणांच्या उत्साहाने शहरात जे सेवाभावी उपक्रम राबवत आहेत, ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या बहुमूल्य सहकार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाला प्रतिष्ठानच्या वतीने आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर, सचिव प्रकाश राऊळ, उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सहसचिव विदुल पाटकर, सल्लागार अण्णा देसाई, सदस्या मेघना राऊळ यांच्यासह सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, गुरुनाथ कदम आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.