देवगड सभापती पदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापती पदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड

देवगड सभापती पदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापती पदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड

देवगड


       तब्बल चार वर्षानंतर देवगड पंचायत समितीच्या कारभारावर सभापती व उपसभापती विराजमान झाले आहेत. झालेल्या निवडीमध्ये सभापतीपदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड झाली आहे. जि.प.व.पं.स.निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून लोकप्रतिनिधीराज प्रस्थापित झाले आहे. यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया तहसिलदार आर.जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सभापतीपदासाठी भाजपातर्फे गणेश राणे यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे अमोल लोके यांनी एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील, मंडळ अधिकारी विनायक शेट्ये, पं. स. कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक मेधा राणे व कुणाल मांजरेकर, महसुल सहाय्यक प्रमोद आचरेकर उपस्थित होते. सभापती व उपसभापतीपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणुक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. पीठासन अधिकारी तथा तहसिलदार आर. जे. पवार यांनी दुपारी ३ वाजता सभापती पदी भाजपाचे गणेश राणे वउपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच पं.स.कार्यालय परिसरात भाजपा शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपाचे माजी आमदार अॅड. अजित गोगटे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, महेश नारकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. उषःकला केळूस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, विठ्ठल नाईकधुरे, महेश जंगले, संतोष किंजवडेकर, जि.प. सदस्य सुनिल पारकर, सौ.सावी लोके, सुयोगी घाडी, पं.स. सदस्य रवींद्र तिर्लोटकर, विष्णु घाडी, सदाशिव ओगले, संजना आळवे, सादिक डोंगरकर, अंकूश ठुकरूल, स्नेहा अनभवणे आदी पंचायत समिती सदस्य तसेच भाजपा शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, डॉ. अमोल तेली, पडेल सरपंच भुषण पोकळे, मोंड उपसरपंच अभय बापट, रवी पाळेकर, मंगेश लोके, महेश ताम्हणकर, प्रकाश गोगटे, पंकज दुखंडे, उल्हास मणचेकर, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, श्रीकृष्ण अनभवणे आदी भाजपा-शिवसेना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित सभापती गणेश राणे यांनी जनतेला अभिप्रेत काम करून पक्षश्रेष्ठींनी दिलेला विश्वास सार्थकी लावू असे सांगीतले.