जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादकांना २ कोटींची मदत ...अध्यक्ष मनीष दळवींची माहिती, व्याजदरात अतिरिक्त सवलत 

जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादकांना २ कोटींची मदत ...अध्यक्ष मनीष दळवींची माहिती, व्याजदरात अतिरिक्त सवलत 

 

सिंधुदुर्गनगरी

 

     जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आंबा व काजू पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेच्या नफ्यातून आणि कर्ज व्याजदरामध्ये अतिरिक्त २ टक्के व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्हा बँक आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून सुमारे २ कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली आहे.शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड व्हावी आणि प्रामाणिक कर्जदारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने बँकेने हे पाऊल उचलले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा बागायतदार अडचणीत असतात, अशा परिस्थितीत बँकेने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आधार ठरणारा आहे. या सवलतीमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवरील व्याजाचा बोजा कमी होणार असून, त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. जिल्हा बँकेने आपल्या नफ्यातील हिस्सा थेट शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वापरण्याचा हा निर्णय घेतल्याने सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे.