वैभववाडी पं. स. सभापतीपदी सिद्धेश रावराणे तर उपसभापतीपदी साची कोलते बिनविरोध
वैभववाडी
वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे तर उपसभापतीपदी साची सचिन कोलते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सभापतीपदी युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याकडे दोन्ही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. रावराणे व कोलते यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.या दोघांच्या नावाची घोषणा होतच वैभववाडी भाजपा पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

konkansamwad 
